Ad will apear here
Next
द मिरॅकल मॉर्निंग
जन्माला येणाऱ्यांच्या जीवनात मृत्यू अटळ असतो; पण म्हणून त्याचे दुःख न करता ते समजावून घेत जीवनात आनंद शोधायला शिकले पाहिजे, असा सल्ला हॅल एलरॉड यांनी ‘द मिरॅकल मॉर्निंग’मधून दिला आहे. पहाटेच्या जीवनशैलीने सकारात्मक बदल कसा करावा, याबद्दल त्यांनी या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण यांनी केला आहे. जीवघेण्या अपघातात संपूर्ण शरीर जायबंदी झाले, तरी हॅल एलरॉड यांनी मनोबलाच्या जोरावर पुन्हा काम सुरू केले. त्यानंतर पुन्हा जीवनाची गाडी उतारावर लागली, तेव्हा त्यांच्या मित्राने पहाटे उठून धावण्याचा मंत्र दिला. त्यातून जीवनात झालेल्या परिवर्तनामुळे लेखकाने व्यक्तिविकासाची ‘द मिरॅकल मॉर्निंग’ ही आगळी पद्धत तयार केली. पहाटे उठून सहा सवयी (SAVERS) आचरणात आणल्यास अनेक गोष्टी कशा साध्य होऊ शकतात, याबद्दल लेखकाने या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. नैराश्यावर मात करणे, सामान्यत्वाकडून असामान्यतेकडे वाटचाल, व्यक्तिमत्त्व विकास, ध्येय-स्वप्ने साध्य करणे हे पहाटेच्या जीवनशैलीने कसे शक्य आहे, हे यातून समजते. पहाटेच्या सहा मिनिटांतील वास्तवाभिमुखतेबद्दलही या पुस्तकात टिप्स दिल्या आहेत. 

पुस्तक : द मिरॅकल मॉर्निंग
लेखक : हॅल एलरॉड
मराठी अनुवाद : डॉ. कमलेश सोमण
प्रकाशन : गोयल प्रकाशन
पृष्ठे : २५६
मूल्य : २५० रुपये

(‘द मिरॅकल मॉर्निंग’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZSPCA
Similar Posts
दी फोर अवर वर्क विक जीवनात नेहमीच वेगळे, नवीन टप्पे येत राहतात. नवीन वाटा, दिशा शोधणे हे आवश्यक असतेच, पण त्यासाठी आंतरिक उर्मी हवी. म्हणूनच वेगवेगळ्या टप्प्यांवर करियरचे नियोजन करण्याऐवजी ‘लाइफस्टाइल डिझाइन’ या संकल्पनेचा विचार करण्याची गरज टीमोथी फेरीस यांनी ‘दी फोर अवर वर्क विक’मधून व्यक्त करीत ती प्रत्यक्ष कशी आणता येईल, हे विस्ताराने सांगितले आहे
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे
‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ पुणे : ‘देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे,’ असे मत कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले.‘सीएनएन-टीव्ही १८’चे कार्यकारी संपादक भूपेंद्र चौबे यांनी जोशी यांची मुलाखत घेतली. पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया आणि सागर चोरडिया या वेळी उपस्थित होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language